570 likes | 1.03k Views
‘ ‘ होय...संगणकावर मराठीतून सहज काम करता येते ’. मरा मराठीसाठी संगणक मराठी अभ्यास केंद्र संगणकीय मराठी व माहिती तंत्रज्ञान गट. कार्यशाळेचे उद्दिष्ट. कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय इंग्रजीप्रमाणेच मराठीतूनही संगणकावर सर्व कामे करता येतात हा आत्मविश्वास देणे
E N D
‘ ‘होय...संगणकावर मराठीतून सहज काम करता येते’ मरामराठीसाठी संगणकमराठी अभ्यास केंद्रसंगणकीय मराठी व माहिती तंत्रज्ञान गट
कार्यशाळेचे उद्दिष्ट • कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय इंग्रजीप्रमाणेच मराठीतूनही संगणकावर सर्व कामे करता येतात हा आत्मविश्वास देणे • प्रमाणित (Standard)पद्धतीने संगणकीय व्यवहार करण्याचे महत्व ठसवणे
संगणकावर भारतीय भाषा म्हंटले की आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रश्नचिन्हांची मालिका • संगणकावर मराठी वापरणे किचकट आहे • मराठीतून ई-मेल पाठवता येत नाही • मराठीची सोय कुठे असते याचा थांगपत्ता नाही • मराठीत शिवाजी, कृतिदेव असे टंक विकत मिळतात. मी कोणता घ्यावा ?
वीज जोडणी..प्लगचे प्रमाणीकरण भारतात कुठेही जा...ह्याईलेक्ट्रिकल प्लगचा आकार व मांडणी बदलत नाही
वीज जोडणी असोवाइतर उत्पादने प्रमाणीकरण महत्त्वाचे ज्याप्रमाणे ISI चा मार्क असणारी उत्पादने भरवशाची असतात तसेच प्रमाणित तंत्रज्ञान दर्जाची हमी देते.....
संगणकीय तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण.. • संगणकालाकोणतीहीमानवीभाषाकळतनाही मराठी असो वा मँडेरीन संगणकालाफक्त० व १ ची Binary भाषा कळते या प्रमाणीकरणामुळेच डिजिटल तंत्रज्ञान जग व्यापून आहे
युनिकोड संकल्पनेचा उदय • संगणकाची बाजारपेठ जागतिक असल्यामुळे प्रत्येक देशातल्या भाषांचे प्रमाणीकरण करण्याची गरज बहुराष्ट्रीय कंपन्यांना भासू लागली. त्यामुळे भाषा वापरण्याची सोय (Input Language) एकसारखी असावी यावर तज्ज्ञांचे एकमत झाले. • यातूनच युनिकोड (एकसमान मानक)संकल्पनेचाउदय १९९१ मध्ये झाला. • २००० पासूनभारतात युनिकोडचा सार्वत्रिक वापर सुरु झाला
युनिकोड म्हणजे काय कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम असो किंवा प्रोग्रॅम जगातल्या कोणत्याही भाषेतून लोकांना संगणक वापरता येणेहे युनिकोडचे तत्वज्ञान आहे. जागतिक मान्यता • जगातल्या सर्व संगणक कंपन्यांनी युनिकोडला मान्यतादिली आहे- • मायक्रोसॉफ्ट • ऍपल • लिनक्स (युनिक्स) • गुगल
युनिकोडचे तत्त्वज्ञान What is Unicode? Unicode provides a unique number for every character, no matter what the platform, no matter what the program,no matter what the language. पाहा-www.unicode.org जगभरातील संगणकांमध्ये सर्व भाषांच्या वर्णमाला वापरता याव्यात यासाठी युनिकोड कन्सॉर्शिया ह्या विनानफा संस्थेची १९९२ मध्ये स्थापना झाली.
महाराष्ट्र शासनाने युनिकोडला दिलेली अधिकृत मान्यता...परिपत्रकाची प्रत
युनिकोड नेमके असते कुठे?युनिकोड सुरू कसे करायचे?युनिकोड मराठी सुरू झाल्यावर नेमका वापर कसा करायचा?
युनिकोडचे फायदे • वापरण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाही. • फाँट बनवणार्या कंपन्यांच्या वेठीस ग्राहक बांधला जात नाही • विंडोज एक्स पी, व्हिस्टा, विंडोज 7 व लिनक्स अशा सर्वऑपरेटिंग सिस्टममध्ये उपलब्ध आहे • ऑनलाईन व्यवहारात युनिकोड अखेरचा शब्द आहे
इ-मेल मराठीतून पाठवता येतं आणि पाहताही येतं
Word किंवा WordPad सारख्यालेखन प्रणाल्या मराठी लिहिण्यासाठी वापरू शकतो त्यासाठी आकृती किंवी श्रीलिपी वापरण्याची गरज नाही... मायक्रोसॉफ्ट वर्डमधीलतीलही सगळी कामं मराठीत अगदी सहज होतात Excel मध्येही मराठी मजकुरावर प्रक्रिया करता येते
फाइल्सना आपण नेहमीच इंग्रजीत नावे देतो...पण मराठीत नावं दिलेल्या फाइल्स पाहिल्या आहेत?
युनिकोडचे इंटरनेटवरील फायदे • मराठीतून गुगलवर माहिती शोधता येते • मराठीतून ब्लॉग व वेबसाईट तयार करता येतात • युनिकोड मराठीतून तयार केलेल्या वेबसाईटवरील माहितीचा थेट वापर करता येतो
मराठीसाठी कीबोर्ड एक कळीचा मुद्दा.....
कोणता कीबोर्ड वापरावा • मराठी टाईपिंगसाठी इन्स्क्रिप्ट(Inscript) चा कीबोर्डच शिकावा. हा युनिकोडप्रमाणेच संगणकावर by default उपलब्धअसतो. • फोनेटिक/Transliteration ही पळवाट आणि अकार्यक्षम पद्धत..कारण... • K वर क पण ख साठी kha अश्या तीन कळा दाबाव्या लागतात. • फोनेटिकसाठी इंग्रजी स्पेलिंगची काळजी वाहावी लागते • इंग्रजीतून मराठी लिहिण्याचा द्राविडी प्राणायम
इन्स्क्रिप्टच्या कीबोर्डचे महत्त्व काय ? • केंद्र शासनाची मोहोर...D o E…B I S ची मान्यता • जसे चांदा ते बांदा..युनिकोड...तसा इन्स्क्रिप्ट • कुठेही जा..कोणताही संगणक वापरा..कीबोर्ड तोच • सराव केल्यास शिकण्यास अतिशय सोपा.
युनिकोड फाँटबद्दल थोडेसे.... • मंगल हा युनिकोड देवनागरी टंक (फॉंट) असला तरी त्यात मराठीच्या दृष्टीने दोष आहेत. • Arial Unicode MS, संस्कृत २००३ हे टंक वापरा • http://tdil.mit.gov.in/download/openfonts.htmया वेबसाईटवर अधिक टंक उपलब्ध आहेत • ऑफिस २०१० बरोबर अपराजिता, उत्साह व कोकिला हे मराठी टंक उपलब्ध आहेत • शिवाजी, कृतिदेव हे युनिकोड टंक नाहीत. त्यामुळे त्यात केलेले काम सर्वांना वापरता येत नाही.
संगणकीय मराठीसाठी धोरणात्मक निर्णयांची गरज • महाराष्ट्रात विकल्या जाणार्या सर्व संगणकांवर मराठी कार्यान्वित करुन विकण्याची ऑपरेटिंग सिस्टमच्या कंपन्यांवर सक्ती. उदा. मायक्रोसॉफ्ट • संगणकावर मराठीवापरण्याची माहिती त्यांच्या माहिती पुस्तिकेत मराठीतून देणे बंधनकारक असावे.
धोरणात्मक निर्णयाची गरज • सर्व संगणकांवर इंग्रजी आणि देवनागरीसाठीचा द्वैभाषिक कळफलक संगणक विक्रेत्यांना सक्तिचा करावा • अधिकृत वर्णमालेप्रमाणे मराठीसाठीचे १० टंक तयार करुन घेऊन ते महाजालावरती फुकट वापरण्यासाठी उपलब्ध करावेत.